-
लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठेने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच कलाविश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
‘सनई चौघडे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘बंध नायलॉनचे’, ‘शुभ लग्न सावधान’ अशा अनेक चित्रपटांतून श्रुतीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीने काम केले आहे.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत ती श्रुती प्रकाश या नावाने प्रसिद्ध आहे.
-
सिनेमांसोबत मालिका आणि जाहिरांतीमध्ये अभिनय करून श्रुतीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
-
ऑन स्क्रीन प्रेक्षकांचं मनोरंदन करणारी श्रुती आता पडद्यामागील भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
श्रुतीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत तिच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.
-
श्रुती आणि तिचा पती गौरव घाटणेकर मिळून झी मराठी वाहिनीवरील मालिकेची निर्मिती करत आहेत.
-
गौरव हादेखील एक उत्तम अभिनेता आहे.
-
अभिनेत्याबरोबरच तो निर्माताही आहे. ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ ही त्याची निर्मिती कंपनी आहे.
-
झी मराठीवरील नव्याने सुरू होणारी ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची निर्मिती श्रुती आणि गौरव करणार आहेत.
-
ही नवीन मालिका ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
श्रुतीच्या या नव्या वाटचालीसाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो : श्रुती मराठे, गौरव घाटणेकर/ इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक