-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्टाला प्रदर्शित होणार आहे.
-
‘लायगर’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता.
-
त्यानंतर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेलं चित्रपटातील ‘आफत’ हे गाणंही हिट ठरत आहे.
-
या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे.
-
अनन्या आणि विजय गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.
-
‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेलं हटके फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अनन्या आणि विजय देवरकोंडाने नुकतंच बीचवर रोमॅंटिक फोटोशूट केलं आहे.
-
फोटोमध्ये अनन्याने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
तर विजय देवरकोंडाने प्रिंटेड शर्ट परिधान केला आहे.
-
त्यांचे हे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
याआधीही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईच्या लोकलमधून अनन्या आणि विजय देवरकोंडाने प्रवास केला होता.
-
लोकलमधील या दोघांच्या फोटोंनीही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
-
अनन्या आणि विजय देवरकोंडाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
-
(सर्व फोटो : अनन्या पांडे, विजय देवरकोंडा/ इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा