-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ७ मे २०२१ रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली.
-
दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने सोनाली व कुणालचा विवाह पार पडला होता.
-
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर सोनाली व कुणाल पुन्हा एकदा थाटामाटात लग्नबंधनात अडकले.
-
लंडनमध्ये कुटुंबिय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत सोनाली-कुणालचा विवाह सोहळा पार पडला.
-
सोनालीच्या लग्नाचा व्हिडीओ ११ ऑगस्टला प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
एखाद्या मराठी कलाकाराच्या विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
नुकताच सोनालीने विवाह सोहळ्याचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
यामध्ये सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण विवाहसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहाता येणार आहे.
-
“Pandemic मुळे दोन वेळा Postpone करून तिसऱ्यांदा Cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता Register Marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना Travel करता नाही आलं. Zoom Call वरून साक्षीदार झाले. पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि Celebrate करू अश्या आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही Court Marriage केलं अशी पोस्ट सोनालीने शेअर केली होती.
-
“यंदा, आमच्या पहिल्या Wedding Anniversary ला आम्ही सह कुटुंब – सह परिवार – ठरल्या प्रमाणे – संपूर्ण विधीपूर्वक – मराठमोळ्या पद्धतीने – अगदी स्वप्नवत – लग्न केलं. P.S. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं Share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
लग्नसोहळ्याचे काही फोटो सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने हिरव्या रंगाची सुंदर पैठणी साडी नेसली आहे.
-
“हा श्रृंगार वेगळाच…” असे कॅप्शन सोनालीने या फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंमध्ये सोनालीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून सोबतच त्याला साजेसा मेकअपही केला आहे.
-
“सोनालीच्या पहिल्याच लग्नाची दुसरी गोष्ट! पहा सोनालीच्या लग्नाची Exculsive झलक…” असे कॅप्शन ट्रेलरला प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने दिले आहे.
-
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी, प्लॅनेट मराठी / इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती