-
गायिका कार्तिकी गायकवाड‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.
-
डिसेंबर २०२०मध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
-
कार्तिकीने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधत चाहत्यांना सुखद धक्काच दिला होता.
-
कार्तिकी गायकवाड सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि आपल्या कामाचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.
-
याशिवाय कार्तिकी अनेकदा पती रोनित पिसे सोबतचे फोटो देखील तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते.
-
आता देखील तिने आपल्या नवऱ्यासोबतचे काही खास फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
सध्या कार्तिकी-रोनित थायलंडमध्ये सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहेत.
-
आपल्या थायलंड ट्रीपचे आणखी काही फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये कार्तिकी आणि तिचा पती रोनित यांनी प्राणी संग्रहालयाला भेट दिल्याचं दिसत आहे.
-
कार्तिकीने खऱ्या खुऱ्या वाघासोबत पोझ दिलेले काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
कार्तिकी गायकवाडच्या इन्स्टाग्राम फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
या फोटोंमधील कार्तिकीचा स्टायलिश, ग्लॅमरस आणि ब्यूटिफूल अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
-
या ट्रीपच्या वेळीचा तिचा वेस्टर्न लूक खूप व्हायरल होताना दिसत आहे.
-
कार्तिकी आणि रोनितने थायलंडच्या समुद्रकिनारी खास पोझ देत फोटोशूट केलं आहे.
-
समुद्रकिनारी पती रोनितबरोबरचा तिचा रोमँटिक फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे.
-
एकूणच कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांची थायलंड ट्रीप सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सर्व फोटो- कार्तिकी गायकवाड इन्स्टाग्राम

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती