-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सुयश टिळकची पत्नी आयुषी टिळक पहिल्यांदाच ‘पोर ब्युटिफुल’ या म्युझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांचा भेटीला आली आहे.
-
आयुषीचा ‘पोर ब्युटिफुल’ हा म्युझिक व्हिडीओ युट्यूबद्वारे लाँच करण्यात आला.
-
सिग्नेचर ट्युन्सनं एबी एंटरटेन्मेंटच्या सहकार्यानं निर्मिती केलेल्या या म्युझिक व्हिडीओमध्ये स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेताही पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे.
-
स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे.
-
आतापर्यंत अनेक परदेशी कलाकार म्युझिकव्हिडीओमध्ये दिसले असले, तरी रशियन अभिनेता पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे.
-
श्रेयश राज आंगणे यांनी या म्युझिक व्हिडिओचं गीत लेखन, गायन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे, तर अमित बाईंग यांनी नृत्य दिग्दर्शन आणि म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे.
-
‘तुला बघून म्हणतोय आईना, पोर ब्युटिफुल हाय ना…’ असे हलकेफुलके शब्द आणि उडती चाल यामुळे हे गाणं नक्कीच संगीतप्रेमींना आवडेल.
-
या गाण्याचं छायांकन हरेश सावंत यांनी सांभाळले असून अन्य तांत्रिक बाजूही उत्तम असल्यानं गाणं प्रेक्षणीय झालं आहे.
-
वसईच्या निसर्गरम्य परिसरात या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आयुषी भावे टिळक / इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार