-
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूला ओळखले जाते.
-
महेश बाबूने अभिनयासोबत आपल्या डॅशिंग पर्सनॅलिटीने चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झालेला महेश बाबू आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर हे जोडपे सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे.
-
महेश बाबू हा अभिनेत्री नम्रता शिरोडकरला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला होता.
-
ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांचा चाहतावर्ग फार मोठा आहे.
-
महेशबाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे.
-
ती सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
-
काही महिन्यांपूर्वी नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ask me anything द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता.
-
यावेळी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतही महेश बाबू यांच्याबद्दलही अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची तिने फार हटके शब्दात उत्तरं दिली.
-
यावेळी एका चाहत्याने नम्रताला प्रश्न विचारला, ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ त्यावर तिने मजेशीर उत्तर दिले होते.
-
त्यासोबतच तिने तिच्या मनातील इच्छाही बोलून दाखवली.
-
चाहत्याच्या या प्रश्नावार उत्तर देताना ती म्हणाली, ‘माझीसुद्धा फार इच्छा आहे. पण माझ्या दोन्हीही मुलांना मराठी येते. त्यासोबत त्यांना इंग्रजी आणि तेलुगू भाषाही बोलता येते’, असे तिने सांगितले.
-
दरम्यान चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं.
-
महेश आणि नम्रताला दोन मुलं असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का