-
संपूर्ण देशात आज रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. मग सेलिब्रिटी तरी मागे कसे राहतील.
-
आज अनेक सेलिब्रिटी आपल्या भावंडांसोबत रक्षाबंधन साजरा करत आहेत. (Indian Express File Photo)
-
दरम्यान, टीव्ही अभिनेत्री निया शर्मानेही आपल्या भावासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.
-
याचे फोटोही तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
तिच्या फोटोला अनेकांनी लाइक केले आहे. मात्र बऱ्याचजणांनी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले आहे.
-
पण नियाला तिच्या कपड्यांवरून पहिल्यांदाच ट्रोल केलेलं नाही. याआधी बऱ्याचवेळा नियावर तिच्या कपड्यांवरून टीका करण्यात आली आहे.
-
निया शर्मा ही हिंदी टीव्ही जगतातील एक बोल्ड अभिनेत्री आहे.
-
निया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर ७.६ मिलियन युजर्स फॉलो करतात.
-
ती तिच्या बोल्ड पेहरावासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ती आपले विचारही नेहमी प्रकटपणे मांडताना दिसते.
-
निया अनेकदा तिचा भाऊ विनयसोबत वेळ घालवताना दिसते. परंतु अभिनेत्री तिच्या पहिल्या शो ‘एक हजारों में मेरी बहना है’चा निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा यालाही तिचा भाऊ मानते.
-
निया दरवर्षी रक्षाबंधनाच्या आधी सिद्धार्थला राखी बांधते.
-
यंदाच्या रक्षाबंधनचे फोटोही तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
-
या सेलिब्रेशनच्यावेळी नियाने गुलाबी रंगाचा डीप नेक ड्रेस घातला आहे. या ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले आहे.
-
या ड्रेसमध्ये निया तिचा क्लीवेज फ्लॉंट करताना दिसत आहे, ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
-
या फोटोवर नियाला अनेक निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत. नियाच्या या फोटोंवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे, “या दिवशी तरी चांगले कपडे घालायचे होते.” (Photos : Instagram/Nia Sharma)

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही…”, सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या शूटिंगची सांगितली आठवण; म्हणाला, “सुहागरातच्या सीनमुळे मी…”