-
मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव टॉपला आहे.
-
कर्करोगासारख्या आजारावर यशस्वीरित्या मात करत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमध्ये ते सध्या काम करत आहेत.
-
शरद पोंक्षे सोशल मीडियावरही फार सक्रिय आहेत.
-
नेहमीच्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
यादरम्यानचे काही फोटो आणि खास पोस्ट त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केली आहे.
-
ही पोस्ट शेअर करताना त्यांनी म्हटलं की, आज रत्नागिरीत ‘फाळणीच्या वेदना’ हा लेख संग्रह माझ्या हस्ते प्रकाशित झाला व फाळणी ह्या विषयावर व्याख्यान झालं.पाऊस असूनही सभागृह पूर्ण भरलं होतं. रसिकांना धन्यवाद.”
-
शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सभागृहामधील गर्दी स्पष्टपणे दिसून येत आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”