-
बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.
-
११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला.
-
प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती.
-
आमिरचा चित्रपट म्हटलं की प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच पाहायला मिळत आहे.
-
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपये कमाई केली.
-
तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पूर्णच घसरला. दुसऱ्या दिवशी फक्त ७ कोटी ५० लाख रुपये या चित्रपटाने कमावले.
-
‘लाल सिंग चड्ढा’ने शनिवारी फक्त ९ ते १० कोटी रुपयांची कमाई केली.
-
अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी फक्त १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
‘लाल सिंग चड्ढा’ चार दिवसांमध्ये फक्त ३७ कोटी ९६ लाख रुपयांपर्यंतच कमाई केली आहे.
-
अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटापेक्षाही कमी कमाई ‘लाल सिंग चड्ढा’ने केली आहे.
-
‘सम्राट पृथ्वीराज’ने पहिल्या चार दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर ३९ कोटी ४० लाख रुपयांचा गल्ला जमावला होता. (सर्व फोटो – फाईल फोटो)

IND vs AUS: “मी मारत होतो ना यार…”, राहुल विराटला बाद झालेलं पाहून त्याच्यावरच संतापला, मैदानातचं काय म्हणाला? पाहा VIDEO