-
अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडमधली एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
स्वबळावर तिने स्वतःला सिद्ध करत तिने ओळख निर्माण केली आहे.
-
आलिया लवकरच ब्रम्हास्त्र या चित्रपटात झळणार आहे.
-
चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून आलिया या चित्रपटाबद्दल काही ना काही नवी बातमी चाहत्यांना सांगत असते.
-
रणबीर आणि आलियावर चित्रित झालेल्या या चित्रपटातील ‘केसरिया तेरा’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी याने केले आहे.
-
आलिया आणि अयान एकमेकांचे खूप चांगले मित्र मैत्रिणी आहेत.
-
नुकतेच अयान याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘ब्रम्हास्त्र’च्या सेटवरचे कधीही न पाहिलेले फोटो आलियाने शेअर केले आणि अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
-
पहिल्या फोटोत आलिया आणि अयान एका लोखंडी कंपाऊंडच्या आडून एकमेकांकडे बघत आहेत.
-
तर दुसऱ्या फोटोत आलिया आणि अयान शूटिंगमधून ब्रेक घेऊन गप्पा मारताना दिसत आहेत.
-
आणखीन एका फोटोत अयान आलियाला सीन समजावून सांगताना दिसत आहे.
-
ब्रम्हास्त्र हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. सर्व फोटो सौजन्य: आलिया भट्ट (इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”