-
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांच्या ब्रेकअपची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली.
-
एकमेकांना ६ वर्षं डेट केल्यानंतर दिशा आणि टायगर यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
-
टायगरने दिशाला लग्नासाठी नकार दिल्यानंतर दिशा टायगरपासून वेगळी झाली असं बोललं जातं.
-
पण या व्यतिरिक्त अभिनेत्री आकांक्षा शर्मामुळेही या दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत.
-
आकांक्षा शर्मा आणि टायगर श्रॉफ यांनी दोन व्हिडीओ साँगसाठी एकत्र काम केलं आहे.
-
दिशा पाटनीशी ब्रेकअप झाल्यानंतर टायगर श्रॉफ आकांक्षा शर्माला डेट करत असल्याचं बोललं जातंय.
-
एकीकडे टायगर आणि आकांक्षाच्या अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलंय.
-
तर दुसरीकडे अभिनेत्री दिशा पाटनी आणि आकांक्षा शर्मा यांच्यात तुलनाही होताना दिसत आहे.
-
ग्लॅमर आणि सौंदर्याच्या बाबतीत आकांक्षा शर्मा सुद्धा दिशापेक्षा कमी नाही.
-
सध्या सोशल मीडियावर आकांक्षा शर्माच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंची जोरदार चर्चा आहे.
-
फिटनेसच्या बाबतीतही आकांक्षा शर्मा खूपच जागरूक असल्याचं तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवरून दिसून येतं.
-
तिचे फोटो पाहिल्यानंतर ग्लॅमरच्या बाबतीत आकांक्षा शर्मा दिशा पाटनीला खरंच टक्कर देते असं म्हणता येईल.
-
टायगर श्रॉफ आणि आकांक्षाबद्दल बोलायचं तर त्यांनी ‘कॅसेनोवा’ आणि ‘आय एम ए डिस्को डान्सर २.०’ या गाण्यात एकत्र काम केलंय.
-
काही दिवसांपूर्वीच टायगरनं आकांक्षाला डेट करत नसल्याचं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.
-
मात्र बी-टाऊनमध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.
-
आकांक्षाने या व्यतिरिक्त बादशाहसोबत हिट म्युझिक व्हिडीओ ‘जुगनू’मध्येही काम केलं आहे.
-
(फोटो साभार- दिशा पाटनी, टायगर श्रॉफ, आकांक्षा शर्मा इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित