-
अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा हे करण जोहरच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे.
-
हा सिनेमा एका बॉक्सरच्या आयुष्यावर आणि त्याच्या संघर्षावर बेतलेला आहे.
-
त्याच निमित्ताने हे दोघे सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
-
नुकतंच अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांनी एकत्र फोटोशूट केलं आहे.
-
अनन्या आणि विजय यांच्याबरोबर साऊथ इंडस्ट्रीची दिग्गज अभिनेत्री रम्या कृष्णनसुद्धा या सिनेमात आपल्याला बघायला मिळेल.
-
या फोटोशूटमध्ये अनन्या ग्लॅमरस अवतारात तुम्हाला पाहायला मिळेल.
-
अनन्या सध्या सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकसाठी चर्चेत असते.
-
याबरोबरच स्टारकीड म्हणून तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलही केलं जातं.
-
या फोटोशूटमध्ये अनन्याने निळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
-
अनन्याने करण जोहरच्या सिनेमातून पदार्पण केलं पण तिच्या गेहराईयां या चित्रपटातल्या कामाची प्रेक्षकांनी तारीफ केली.
-
अनन्या आणि विजयच्या या आगामी सिनेमात लोकप्रिय बॉक्सर माईक टायसनचीसुद्धा झलक लोकांना पाहायला मिळू शकते.
-
विजय देवरकोंडा याचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. (सगळे फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

…अन् क्षणात गमावले तब्बल ६१ लाख! मराठी अभिनेत्याची फसवणूक; ‘ती’ गोष्ट पडली महागात, नेमकं प्रकरण काय?