-
बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असणारा अभिनेता सैफ अली खानचा आज वाढदिवस.
-
हम तुम’, ‘ओमकारा’, ‘कल हो ना हो’, ‘हम साथ साथ है’, ‘रेस’, ‘तान्हाजी’ असे एक सो एक हिट चित्रपट देऊन सैफने त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली.
-
‘सिक्रेड गेम्स’ वेब सीरिजमधून त्याने ओटीटीवर पदार्पण करत अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले.
-
सैफ अली खान हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे. त्यामुळे अभिनयाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं.
-
अभिनयाप्रमाणेच सैफला क्रिकेटचीही आवड होती. त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी क्रिकेटर होते.
-
एवढचं नाही तर सैफचे आजोबा इफ्तिखार अली खान पटौडी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलं आहे.
-
त्यामुळे लहानपणापासूनच अभिनयाबरोबरच क्रिकेटमध्येही सैफला रुची निर्माण झाली होती.
-
परंतु, वडिलांप्रमाणे आपण चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही हे उमगल्यावर अभिनयाची वाट धरल्याचा खुलासा सैफने एका मुलाखतीदरम्यान केला होता.
-
यावर सैफला “तुझ्या आईप्रमाणे तूदेखील चांगला कलाकार बनू शकशील असं वाटतं का?”, असा प्रश्न विचारण्यात आला.
-
“माझ्या आईप्रमाणेच मलाही चांगला कलाकार, अभिनेता व्हायचं आहे. आणि मला वाटतं की मी हे करू शकतो. मी अभिनय करू शकतो, हे मला माहीत होतं. पण, मी क्रिकेट खेळू शकणार नाही, हेही मला समजलं होतं.”, असं सैफ म्हणाला होता.
-
पुढे तो म्हणाला,”पूर्ण देशातून फक्त ११ जणांना भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळते. मी क्रिकेट खेळू शकलो असतो तर मला आनंदच झाला असता”.
-
“जर मी क्रिकेट खेळलो असतो तर सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा स्टार असतो. माझ्या निमित्ताने पतौडी कुटुंबातून तिसरी पिढीही क्रिकेट खेळली असती. आजोबा कॅप्टन, वडील कॅप्टन आणि मुलगा सैफ अली खान…कॅप्टन ऑफ इंडिया.”, असंही सैफ म्हणाला.
-
चित्रपटात क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली तर यावर हसत सैफ उत्तर देत म्हणाला, “मी तो चित्रपट केला नसता. कारण मला क्रिकेट खेळता येत नाही, हे माहीत आहे ”.
-
या मुलाखतीनंतर सैफने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं.
-
आता सैफ बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफला तैमुर आणि जेह ही दोन मुले आहेत.
-
सैफची ही पतौडी फॅमिली अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते.(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…