-
छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांचे त्यांच्या को-स्टारशी अफेअर होते. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर या कलाकारांनी इंटस्ट्रीबाहेरचे पार्टनर निवडले आणि लग्न केलं. अशाच काही कलाकारांची नावं जाणून घेऊयात…
-
Manish Nagdev: सृष्टी रोडे आणि मुस्कान अरोरा या अभिनेत्रींसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मनीष नागदेवने मल्लिका जुनेजाशी लग्न केले. मल्लिका ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबाहेरची आहे.
-
Sharad Malhotra: शरद मल्होत्रा आणि दिव्यांका त्रिपाठी यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. पण दिव्यांकाशी ब्रेकअप झाल्यानंतर शरदने रिप्सी भाटियाशी लग्न केलं.
-
Ankita Lokhande: अंकिता लोखंडे तिचा को-स्टार दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचं ब्रेकअप झालं आणि नंतर २०२१ मध्ये अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले.
-
Mouni Roy: मौनी रॉयचे नाव गौरव चोप्रा, मोहित रैना आणि पुलकित सम्राट यांच्याशी जोडले गेले होते. मोहित आणि मौनी बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर मौनीने सूरज नांबियारशी लग्न केले.
-
Mohit Raina: मौनी रॉयशी ब्रेकअप झाल्यानंतर मोहित रैनाने आदितीशी लग्न केले. आदितीचा टीव्ही इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही.
-
Karishma Tanna: अभिनेता उपेन पटेलशी एंजेगमेंट मोडल्यानंतर करिश्मा तन्नाने उद्योगपती वरुण बंगेराशी लग्न केले.
-
Niti Taylor: पार्थ समथनशी ब्रेकअपनंतर नीती टेलरने नौदल अधिकारी परीक्षित बावाशी लग्न केले.
-
Sayantani Ghosh: अभिनेत्री सायंतानी घोष टेरेन्स लुईससोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्याच्याशी ब्रेकअपनंतर सायंतनीने अनुराग तिवारीशी लग्न केले. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस आणि संग्रहित)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित