-
बॉलिवूडचा नवाब म्हणून अभिनेता सैफ अली खान हा ओळखला जातो. आज १६ ऑगस्ट रोजी सैफचा वाढदिवस आहे.
-
सैफ अली खान हा त्याच्या चित्रपटासह विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो.
-
तो त्याचा बराच वेळा कुटुंबियांसोबत पतौडी पॅलेसमध्ये वेळ घालवताना दिसतो.
-
या पॅलेसची किंमत तब्बल ८०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
-
सैफचा ८०० कोटींचा पतौडी पॅलेस हा त्याच्यासाठी फारच खास आहे. या पॅलेसला मिळवण्यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले आहेत.
-
पतौडी पॅलेस हरियाणामधील गुड़गाव या ठिकाणी आहे.
-
पतौडी पॅलेस १९०० साली उभारण्यात आला होता.
-
पतौडी पॅलेस इब्राहिम कोठी या नावाने देखील ओळखला जातो.
-
जीक्यू मासिकानुसार या पॅलेसमध्ये १५० खोल्या, ७ ड्रेसिंग रुम आणि ७ बाथरुम आहेत.
-
सैफ अली खान त्याच्या कामात वेळात वेळ काढून पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतो.
-
नीमराणा ग्रुप ऑफ हॉटेल्सकडून सैफने हा वडिलोपार्जित महाल ८०० कोटींना विकत घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांनी हा महाल नीमराणा ग्रुप ऑफ हॉटेल्सला भाडेतत्त्वावर दिला होता.
-
त्यामुळे २००५ ते २०१४ या काळात त्या पॅलेसला नीमराणा हॉटेल म्हणून ओळखले जायचे.
-
“शंभर वर्षांपूर्वी सैफच्या आजोबांनी त्यांच्या पत्नीसाठी हा आलिशान पतौडी पॅलेस उभारला होता. त्यावेळी ते इथले राजे होते. पण पुढे जाऊन त्या सर्व पदव्या रद्द करण्यात आल्या”, असे सैफने एकदा मुलाखतीदरम्यान म्हटले होते.
-
२०११ मध्ये वडिल मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन झाल्यानंतर सैफला पतौडी पॅलेसबद्दल आकर्षण वाटू लागले. तो कुटुंबाकडे हवा, असेही त्याला वाटले.
-
त्यानंतर जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा सैफने भाडेकरार संपवून रक्कम अदा केली आणि पुन्हा घराचा ताबा मिळवला.
-
भावनिक दृष्टीकोनातून माझ्यासाठी ही संपत्ती अमूल्य आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टीकोनातून तिचे मूल्य ठरविणे मला पटत नाही, असे सैफने या मुलाखतीत म्हटले.
-
माझ्या आजी-आजोबांचा, वडिलांचा दफनविधी इथे झालाय. या ठिकाणी एक सुरक्षा, शांतता आहे. या वास्तुशी मी अध्यात्मिकदृष्टया जोडलेलो आहे, असेही त्याने यावेळी सांगितले होते.
-
माध्यमांमध्ये किंमतीवरुन ज्या बातम्या दिल्या जात आहेत, त्या चुकीच्या आहेत. हा एक चांगला आर्थिक व्यवहार होता. मला हा महाल पुन्हा खरेदी करायची गरज नव्हती कारण आधीपासूनच त्याची मालकी माझ्याकडे होती, असेही सैफने खडसावून एकदा मुलाखतीत सांगितले होते.
-
पतौडी पॅलेस ताब्यात घेताना अदा कराव्या लागलेल्या किंमतीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा त्याने काहीही न बोलता फक्त ही चुकीची माहिती असल्याचे सांगितले होते.
-
दरम्यान सैफ अली खानची एकूण संपत्ती १,१२० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोललं जातं.
-
सर्व फोटो : सैफ अली खान इन्स्टाग्रा
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल