-
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर हे चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित कपलपैकी एक आहे.
-
बिपाशा-करणने २०१६मध्ये थाटामाटात लग्न केलं.
-
करणचं हे दुसरं लग्न आहे. आपल्या होणाऱ्या पतीचा भुतकाळ माहित असताना देखील बिपाशाने करणशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
बिपाशा-करणचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे.
-
हे दोघांच्या फोटो आणि पोस्टवरून लक्षात येतंच.
-
आता लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशा-करणने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे.
-
बिपाशा आई होणार असल्याच्या याआधी चर्चा रंगल्या होत्या.
-
पण बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं कबुल केलं आहे.
-
बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
-
बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे.
-
शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख