-
मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी आणि लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन-सुप्रिया पिळगावकर.
-
सहजीवनाची ३६ वर्षे पूर्ण केलेल्या या जोडप्याचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो तो म्हणजे १७ ऑगस्ट.
-
अवघ्या चार वर्षाचे असताना चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकणार्या अभिनेते सचिन पिळगावकर यांचा ६५वा तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा आज ५५वा वाढदिवस आहे.
-
ऑन स्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही सूर जुळलेल्या या लोकप्रिय जोडीची लव्हस्टोरीही चित्रपटाप्रमाणेच आहे.
-
सचिन-सुप्रिया या लोकप्रिय कलाकारांचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान उल्लेखनीय आहे.
-
१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून सचिन पिळगावकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
-
मराठी सिनेसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही त्यांनी अभिनयाच्या जोरावर स्वत: चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
‘गीत गाता चल’, ‘बालिका बधू’, ‘अंखियों के झारोखों से’ आणि ‘नदिया के पार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.
-
‘शोले’ चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘माय बाप’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवले.
-
१९८४ साली प्रदर्शित झालेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा मराठी चित्रपट. याच चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा सचिन आणि सुप्रिया यांची भेट झाली.
-
‘नवरी मिळे नवऱ्याला’ चित्रपटासाठी सुप्रिया यांना कास्ट करण्यात आलं होतं. तेव्हा त्या नवख्या होत्या. ‘चमेली’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
सचिन पिळगावकरांपेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या सुप्रिया त्यांच्या आईलाही भावल्या होत्या. याबद्दल त्यांनी सचिन यांच्याकडे विचार मांडला.
-
सचिन यांच्या मनातही सुप्रिया पिळगावकरांबद्दल भावना होत्याच. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
परंतु, आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहचवण्याचं धाडस दोघांनाही झालं नाही. शुटिंगदरम्यान सुप्रिया यांना प्रपोज करण्याचा सचिन पिळवगावकरांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही.
-
अखेर चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर सचिन यांनी सुप्रिया यांना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. परंतु, त्यावेळी सुप्रिया यांना वाटलं होतं की ते आधीच विवाहित असतील.
-
आपण अविवाहित आहोत हे सचिन पिळगावकरांना सुप्रिया यांना पटवून द्यावं लागलं होतं.
-
अखेर १ डिसेंबर १९८५ मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली.
-
त्यानंतर दोघांनीही ‘अशी ही बनवा बनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपूते’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली.
-
सचिन-सुप्रिया यांना श्रेया ही मुलगी आहे. श्रेया पिळगावकरदेखील अभिनय क्षेत्रात ठसा उमटवत आहे.
-
(सर्व फोटो : सचिन पिळगावकर/ फेसबुक, इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती