-
नुकतंच बिपाशाने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
-
बिपाशा आणि तिचा नवरा करण सिंग ग्रोवर या दोघांनी एक फोटोशूट केलं ज्यात बिपाशा बेबी बंप खूप दिमाखात फ्लॉन्ट करत आहे.
-
बिपाशाच्या काही दिवस आधीच अभिनेत्री सोनम कपूरच्या डिलिव्हरीची चर्चा सोशल मीडियावर होत होती.
-
सोनम गरोदर असताना तिनेही बिपाशाप्रमाणेच तिचे बेबी बंप फ्लॉन्ट केले होते.
-
पांढऱ्या शुभ्र गाऊनमध्ये सोनमचं हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं होतं.
-
सोनमचं लग्न २०१८ मध्ये मोठे उद्योगपति आनंद अहुजा यांच्याशी झालं होतं!
-
या फोटोशूटनंतर सोनमला प्रचंड ट्रोलही केलं गेलं पण तरी सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असे बरेच फोटोज शेअर केले.
-
सोनम कपूर ही प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आहे आहे आणि ती ‘विरे दी वेडिंग’ या सिनेमात झळकली होती.
-
सोनमला अभिनयावरून प्रचंड ट्रोल केलं जातं. पण तिच्या फॅशन सेन्ससाठी तिचं बरंच कौतुकही केलं जातं.
-
सोनम तिच्या वादग्रस्त वकतव्यांसाठीदेखील बऱ्याचदा चर्चेत असते.
-
बिपाशा, सोनमप्रमाणे बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री, क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनेदेखील बेबी बंप फ्लॉन्ट केले होते.
-
अनुष्काचा विराटबरोबरचा पोल्का डॉट ड्रेसमधला फोटो आणि योगा करत असतानाचा फोटोदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. (सगळे फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”