-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार चर्चेत असतो.
-
या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेला ओळखलं जातं.
-
समीर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो.
-
आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या समीरचं त्याच्या पत्नीवर जीवापाड प्रेम आहे.
-
तो पत्नी कविताबरोबरचे बरेच फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतो.
-
समीर आणि त्याची पत्नी कविताची लव्हस्टोरी देखील अगदी हटके आहे.
-
या दोघांचा प्रेमविवाह आहे. समीरने याबाबत लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितलं.
-
तो म्हणाला, “आमचा प्रेमविवाह आहे. तिला माझा पूर्ण स्वभाव माहित आहे. एकाच नाटकातल्या ग्रुपमध्ये आम्ही दोघं होतो. तेव्हापासून आमच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.”
-
“आमच्या लग्नाचं हे २५वं वर्ष आहे. येत्या नोव्हेंबरला आमच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण होतील. त्याआधी आमचं काही वर्ष अफेअर होतं. मी कसा खोटं वागतो कसं खरं वागतो हे सगळं तिला बरोबर माहित आहे.”
-
“माझ्या पडत्या काळात तसेच उत्पन्नाच्याबाबतीत स्थैर्य नसताना तिने मला खूप पाठिंबा दिला. स्वतः नोकरी केली, स्वतःच्या गरजा कमी करून माझ्या पाठिशी उभी राहिली. कुठलीच तक्रार तिने माझ्यापर्यंत येऊ दिली नाही. माझं करिअर तिने मला करू दिलं.”
-
आज मी जे काही आहे तसेच जेवढं नाव कमावलं आहे ते पत्नीमुळेच असंही समीर आवर्जून सांगतो. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ