-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असणाऱ्या रिअलिटी शोपैकी एक म्हणजे ‘बिग बॉस’.
-
कलाविश्वातील कलाकार ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून एकत्र राहतात.
-
‘बिग बॉस’च्या घरात होणारे स्पर्धकांचे वाद, रुसवे फुगवे, खेळ, टास्क यामुळे हा शो वादग्रस्त असला तरीही तितक्याच आवडीने घराघरात पाहिला जातो.
-
खेळाबरोबरच नाती, एकमेकांप्रती असलेल्या भावना या सगळ्याचाच ‘बिग बॉस’च्या घरात कस लागतो.
-
२०२२च्या ऑक्टोबर महिन्यात ‘बिग बॉस हिंदी’चे १६वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे.
-
त्यामुळे ‘बिग बॉस’च्या या नवीन पर्वाबद्दल समाज माध्यमांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
-
‘बिग बॉस हिंदी’ चे अनेक सीझन बॉलिवूड अभिनेता सलमान खानने होस्ट केले आहेत.
-
शोमध्ये अनेकदा सलमान खान घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो.
-
हा शो होस्ट करण्यासाठी सलमानला कोटी रुपयांचे मानधन मिळते.
-
‘बिग बॉस १६’ साठी त्याने मागच्या सीझनपेक्षा तिपट्ट मानधनाची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.
-
त्याने ‘बिग बॉस हिंदी’च्या १५व्या पर्वासाठी ३५० कोटी मानधन घेतले होते.
-
मीडिया रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वासाठी सलमानने तब्बल एक हजार कोटी मानधन मागितले आहे.
-
याबद्दल ‘बिग बॉस हिंदी’च्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

हनुमान जयंतीनंतर ४ ग्रहांची होणार महायुती; ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसाच पैसा