-
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
अमृताचा इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बराच मोठा चाहतावर्ग आहे.
-
अनेकदा अमृता सोशल मीडियावर कामाच्या अपडेट्ससोबतच स्वतःचे फोटोही शेअर करताना दिसते.
-
आताही अमृताने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अमृताने शेअर केलेल्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अमृताचा साडीतील ग्लॅमसर लुक पाहायला मिळत आहे.
-
अमृताने गुलाबी रंगांची साडी नेसली असून यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
गुलाबी साडी, नाकात नथ आणि मोकळे केस असा अमृताचा ग्लॅमरस अवतार सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.
-
अमृताच्या या फोटोंवर तिचे चाहते कमेंट्स आणि लाइक्स करताना दिसत आहेत.
-
एवढंच नाही तर तिचा पती हिमांशू मल्होत्रानेही या फोटोंवर कमेंट केली आहे.
-
अमृताच्या फोटोवर कमेंट करताना हिमांशूने लिहिलं, “खूबसूरत” आणि यासोबत त्याने हार्ट इमोजीही पोस्ट केला आहे.
-
अमृता खानविलकर लवकरच माधुरी दीक्षितसह ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमात दिसणार आहे.
-
याची माहिती तिने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली होती.
-
(फोटो साभार- अमृता खानविलकर इन्स्टाग्राम )
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच