-
मालिका आणि चित्रपट विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.
-
‘रात्रीस खेळ चाले २’मध्ये तिने साकारलेली शेवंता या पात्राला तूफान लोकप्रियता मिळाली.
-
ती नेहमी हटके फोटोशूट करत नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत त्यांना सरप्राईज देत असते.
-
नुकतेच तिने गोकुळाष्टमीनिमित्त एक फोटोशूट केलं आहे, त्यात ती आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या लुकमध्ये दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये गळ्यात फुलांचा हार, सोन्याचे दागिने, डोक्यावर फेटा अशी तिने भगवान कृष्णाची वेशभूषा आणि त्याच्या जवळ जाणारा मेकअप केला आहे.
-
तर तिच्या चेहऱ्यावरील हावभावही शांत आणि प्रसन्न असल्याचे दिसत आहे.
-
या सगळ्या फोटोंमध्ये तिने छान स्मितहास्य दिले आहे.
-
एका फोटोमध्ये तिने हातात बासरी धरली आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत अपूर्वा ती बासरी वाजवताना दिसत आहे.
-
यातील एका फोटोत तिच्या पाठीमागे ब्रम्हांड आणि पुढ्यात लोण्याने भरलेलं मडकं पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोत ती बसून विचार करताना दिसतेय.
-
तर एका फोटोत तिच्या हातात मोरपिस दिसत आहे.
-
तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून यासाठी तिचे कौतुक केले जात आहे.
सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य