-
सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांना काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं.
-
जीममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
-
राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचं वृत्त समोर आलं होतं.
-
पण आता राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
-
राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूनेही काम करण्याचं बंद केल्याची माहिती त्यांचे मित्र आणि निकटवर्तीय सुनील पाल यांनी दिली आहे.
-
कानपुर येथे राजू श्रीवास्तव यांचा जन्म झाला.
-
१९८८मध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं.
-
एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “त्यावेळी लोक विनोदी कलाकारांना अधिक महत्त्व द्यायचे नाही. हाती काम नसल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागायचा. अशा परिस्थितीमध्ये मी आर्थिक खर्च भागवण्यासाठी रिक्षा चालवायचो.”
-
“रिक्षा चालवत असताना रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांनी मी माझ्या विनोदी शैलीचा वापर करत हसवायचो. याचा अधिक फायदा म्हणजे मला त्याचा मोबदला म्हणून अधिक पैसे मिळायचे. “
-
“एक दिवशी माझ्या रिक्षामध्येच बसलेला प्रवासी आणि माझं बोलणं झालं. त्या बोलण्यामधून मला त्या व्यक्तीने स्टँड अप कॉमेडीसाठी काम मिळवून दिलं. बरीच वर्ष मेहनत केल्यानंतर स्टँड अप कॉमेडियन म्हणून मला शो मिळू लागले.”
-
“वाढदिवसांच्या पार्ट्यांमध्ये स्टँडअप कॉमेडी करण्याचे तेव्हा मला फक्त ५० रुपये मिळायचे.”
-
‘दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामुळे राजू श्रीवास्तव नावारुपाला आले.
-
या कार्यक्रमामध्ये त्यांनी साकारलेलं गजोधर भैय्या हे पात्र तर प्रचंड गाजलं.
-
आजही या पात्रामुळेच प्रेक्षक त्यांना ओळखतात.

Devendra Fadnavis: सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार