-
प्रसिद्ध युट्यूबर आणि शेफ मधुरा बाचल नवनवीन रेसिपीज दाखवून खवय्यांसाठी खाद्यपदार्थांची मेजवानी देत असतात.
-
मराठी पदार्थ जगभरात पोहोचवण्यासाठी २००९ साली त्यांनी युट्यूब चॅनेल सुरु केलं.
-
‘मधुरा रेसिपी’ या नावाने त्यांचे मराठी आणि हिंदी हे दोन युट्यूब चॅनेल्स आहेत.
-
त्यांच्या मराठी चॅनेलला ६.४२ मिलियन आणि हिंदी चॅनेलला १.२८ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.
-
युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मधुरा घराघरात आणि त्यांच्या रेसिपीजमुळे खवय्यांच्या मनातही त्यांनी स्थान निर्माण केलं.
-
आता मधुरा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत त्या झळकल्या आहेत.
-
या मालिकेत सध्या ‘सुगरण नं १’ ही गृहिणींसाठी असलेली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
-
मधुरा बाचल या मालिकेत शेफ आणि ‘सुगरण नं १’ या स्पर्धेच्या प्रशिक्षक म्हणून भूमिका साकारताना दिसत आहेत.
-
मालिकेत काम करण्याच्या अनुभवाबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
-
पोस्टमध्ये त्यांनी “अतिशय स्वप्नवत असंच वाटतं आहे. कोठारे व्हिजनमधून कॉल येतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी शूट करून एपिसोड उद्यापासून टेलिकास्टही होतो. स्टार प्रवाह वाहिनी आणि कोठारे व्हिजन टीमचे अतिशय मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा”, असं म्हटलं आहे.
-
त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
याआधीही त्या झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या रिएलिटी शोमध्ये सेलिब्रिटींना मार्गदर्शन करताना दिसल्या होत्या.
-
आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही आनंद झाला आहे.
-
एक वेगळी वाट निवडूण आपल्या आवडत्या क्षेत्रात कशाप्रकारे करिअर करता येऊ शकतं, याचं मधुरा बाचल उत्तम उदाहरण आहेत.
-
त्यांच्यामुळे अनेक गृहिणींनाही प्रेरणा मिळाली आहे.
-
(सर्व फोटो : मधुरा बाचल/ इन्साग्राम)

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य