-
विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
-
राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट हृदयविकाराचा झटका आला होता.
-
सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती गंभीर आहे.
-
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल त्यांची पत्नी शिखा आणि मुलगी अंतरा वेळोवेळी माहिती देत आहेत.
-
राजू श्रीवास्तव यांचे चाहते त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.
-
राजू श्रीवास्तव यांच्या मुलीबद्दल फारसं कुणाला माहीत नसेल. पण अंतरा श्रीवास्तव ही चित्रपट इंडस्ट्रीत कार्यरत आहे.
-
तिने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माती म्हणून काम केलंय.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंतरा २८ वर्षांची असून तिचे लग्न झालेले नाही.अंतराचा जन्म २० जुलै १९९४ रोजी मुंबईत झाल्याचे सांगितले जाते.
-
अंतराने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमधून केले आहे. तसेच मुंबईतील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून मास मीडिया इन अॅडवर्टायझिंगमध्ये डिग्री पूर्ण केली.
-
२००६ मध्ये अंतराला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय ब्रेव्हरी पुरस्कार देण्यात आला होता. तिने आपल्या आईला तिच्या घरात घुसलेल्या दोन चोरांपासून वाचवले होते, त्या घटनेबद्दल तिला हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी अंतरा फक्त १२ वर्षांची होती.
-
एकदा बोलताना अंतराने या घटनेचा उल्लेख केला होता. तेव्हा तिने सांगितले होते की त्या चोरांकडे बंदुका होत्या, त्यामुळे तिला फक्त त्यांच्या आईला वाचवायचं होतं. अंतराने बेडरूममध्ये जाऊन वडिलांना आणि पोलिसांना मदतीसाठी बोलावले. यानंतर खोलीच्या खिडकीतून इमारतीच्या चौकीदाराला आवाज दिला. चौकीदार आणि पोलिसांनी येऊन तिच्या आईची गुंडांपासून सुटका केली होती. “या 10 मिनिटांच्या घटनेने मला पूर्णपणे बदलून टाकले,” असं अंतरा म्हणाली.
-
२०१३ मध्ये, अंतराने फ्लाइंग ड्रीम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड साठी सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिने मॅक प्रॉडक्शनसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.
-
तिने सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ सारखे चित्रपट केले आहेत.
-
अंतराने निर्माता म्हणून ‘स्पीड डायल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत होता.
-
पलटन चित्रपटाच्या निर्मात्यांच्या टीममध्ये अंतरा होती.
-
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वोडका डायरीज’ या चित्रपटातून अंतराने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.
-
कल्की कोचलिनची मुख्य भूमिका असलेल्या द जॉब चित्रपटाचे कॉस्च्युम डिझाईन अंतराने केले होते
-
(अंतराचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून साभार, तर राजू श्रीवास्तव यांचे फोटो संग्रहित)

हात पाय एकीकडे अन् डोकं एकीकडे; ठाणे रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; VIDEO पाहून कळेल जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही