-
‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो आहे.
-
या शोचा नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या एपिसोडमध्ये ऋचा पवार या स्पर्धकाला रामायणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
-
मात्र, तिला या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने खेळ सोडावा लागला.
-
“खालीलपैकी कोणते वाल्मिकी रामायणातील कांडाचे नाव नाही?” असा तो प्रश्न होता.
-
याच्या उत्तरासाठी सुंदर कांड, वनवास कांड, युद्ध कांड आणि किष्किन्धा कांड हे चार पर्याय देण्यात आले होते.
-
या प्रश्नाचं उत्तर वनवास कांड होतं. पण हे उत्तर ऋचाला माहित नव्हतं, त्यामुळे तिने ६ लाख ४० हजारांची रक्कम घेत खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
-
पण हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही रामायणासंबंधी प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं.
-
अमिताभ बच्चन यांच्या केबीसीमध्ये रामायणा संबंधीच्या प्रश्नाचं उत्तर न देऊ शकल्यामुळे सोनाक्षी ट्रोल झाली होती.
-
कौन बनेगा करोडपती ११ मध्ये सोनाक्षीने हजेरी लावली होती. यादरम्यान ‘रामायणानुसार हनुमानाने संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला माहित नव्हते आणि तिने लाईफलाइनचा वापर केला होता.
-
या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीला देता आले नाही हे पाहून अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्य वाटले होते.
-
“तुझ्या घराचे नाव रामायण आहे. तुझ्या वडिलांचे नाव शत्रुघ्न आहे आणि तुझ्या दोन्ही भावांची नावे लव आणि कुश आहेत.” असं बिग बी तिला म्हणाले होते.
-
यानंतर सोशल मीडियावर सोनाक्षीवर बरेच मीम्स व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
-
(फोटो साभार- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख