-
नवाजुद्दीन सिद्दीकी:
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा नेहमीच आशयघन चित्रपट स्वीकारतो. त्याने ‘मंटो’ आणि ‘हरामखोर’ ती दोन चित्रपटात काम करण्यासाठी फक्त 1 रुपया आकारला होता. -
शाहिद कपूर:
अभिनेता शाहिद कपूरने ‘हैदर’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचं सर्वांनी कौतुक केलं. त्याला या चित्रपटाची स्क्रिप्ट इतकी आवडली की त्याने या चित्रपटासाठी एक रुपयाही मानधन आकारलं नाही. -
शाहरुख खान:
‘हे राम’ चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला. या चित्रपटाचं बजेट शाहरुखला माहित असून फक्त चित्रपटाचा भाग होता यावं म्हणून त्याने या चित्रपटासाठी मानधन आकारले नाही. -
दीपिका पदुकोण:
दीपिका पदुकोणने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात काम करण्यासाठी एक रुपयाही घेतला नाही. याउलट शाहरुख खानबरोबर काम करायला मिळणार याचा तिला जास्त आनंद होता. -
अमिताभ बच्चन:
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सर्वत्र कौतुक झालेल्या ‘ब्लॅक’ चित्रपटात काम करण्यासाठी मानधन घेतले नव्हते. याचे कारण म्हणजे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे काम त्यांनी पाहिले होते. अमिताभ बच्चन यांना संजय यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात काम करायचे होते. -
मीना कुमारी:
‘पाकिझा’ हा अभिनेत्री मीना कुमारी यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी त्यांनी फक्त 1 रुपया मानधन घेतले होते. -
अजय देवगण:
अजय देवगणचा ‘दृश्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटासाठी अजयने आशीर्वाद म्हणून फक्त 1 रुपया मानधन आकारले. -
कतरिना कैफ:
अभिनेत्री कतरिना कैफ हिचे ‘चिकनी चमेली’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. या गाण्यासाठी कतरिनाने एक रुपयाही मानधन आकारले नाही. तिने हे गाणे केवळ तिच्या आणि करण जोहरच्या मैत्रीसाठी केले. -
राजकुमार राव:
राजकुमार राव हा बॉलिवूडमधील एक टॅलेंटेड अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने त्याचा ‘ट्रॅप्ड’ चित्रपट मानधन न आकारता केला होता. -
करीना कपूर:
‘दबंग 2’मधील ‘फेव्हिकॉल से’ हे गाणे करीना कपूरवर चित्रित करण्यात आले. या गाण्यासाठी तिने एक रुपयाही मानधन आकारले नाही. -
फरहान अख्तर:
फरहान अख्तर याने ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपाटासाठी त्याने फक्त 11 रुपये मानधन आकारले. -
सोनम कपूर:
फरहान अख्तरसारखेच ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात करण्यासाठी सोनमनेही फक्त 11 रुपये घेतले. -
राणी मुखर्जी: ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट प्रचंड गाजला. आजही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. यात पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसण्यासाठी अभिनेत्री राणी मुखर्जी हिने एक रुपयाही मानधन आकारले नव्हते.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख