-
लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत ती अप्पू ही मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
-
नुकतंच ज्ञानदाने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
ज्ञानदाने लाल रंगाची साडी नेसून रॉयल लूक केला आहे.
-
नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून मराठमोळा पेहराव केला आहे.
-
ज्ञानदाने केसांत माळलेल्या गुलाबाच्या फुलांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
डिझायनर ब्लाऊज परिधान करत हटके फॅशन केली आहे.
-
ज्ञानदाचे हे घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
ज्ञानदाने ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
-
‘शादी मुबारक’ या हिंदी मालिकेतही ती झळकली होती. (सर्व फोटो : ज्ञानदा रामतिर्थकर/ इन्स्टाग्राम)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा