-
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन.
-
कार्तिकचं फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढताना दिसतंय.
-
आतापर्यंत त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे.
-
भूल भुलैय्या 2 च्या यशानंतर कार्तिक येत्या काळात ‘शेहजादा’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
-
या चित्रपटाच्या घोषणेपासूनच कार्तिकला नव्या भूमिकेत बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
-
सध्या तो या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.
-
पण या बिझी शेड्युलमधूनही वेळ काढून या चित्रपटाबद्दलचे लेटेस्ट अपडेट्स तो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असतो.
-
नुकतेच त्याने या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोत सगळे आपापलं काम करताना दिसत आहेत.
-
तर दुसऱ्या फोटोत कार्तिकच्या चेहऱ्यासमोर चित्रपटाचा बोर्ड दिसत आहे.
-
या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन झळकणार आहे.
-
हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या तेलुगू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.
फोटो सौजन्य: कार्तिक आर्यन (इन्स्टाग्राम)

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य