-
Star Pravah Parivaar Ganeshotsav 2022: गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचेच लाडके दैवत आहे.
-
‘गणपती बाप्पा मोरया’ पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो.
-
भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात.
-
बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.
-
लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज आहे.
-
‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२’ या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकाचा गजर होणार आहे.
-
स्टार प्रवाह परिवारातील १०० कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करतील.
-
आजीच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो.
-
हे मंतरलेले दिवस या गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येतील.
-
स्टार प्रवाह परिवारातल्या बच्चेकंपनीला अष्टविनायकाच्या या कथा आजीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत.
-
मराठी टेलिव्हिजन विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीने मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपलं आहे.
-
त्यामुळे गजर अष्टविनायकाचा हा कार्यक्रम देखिल पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल.
-
या कार्यक्रमात गणपतीच्या आवडीच्या पाच गोष्टींवर आधारित एक खास गाणं देखिल बनवण्यात आलं आहे.
-
‘मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ मधील स्पर्धकांच्या आवाजाने हे गाणं नटलं आहे.
-
अष्टविनायकाच्या कथांसोबतच सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे.
-
त्यासोबतच नंदेश उमप यांनी सादर केलेला लोककलेचा जागर या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवेल.
-
स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे.
-
रविवार २८ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह / इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल