-
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात आर्यनला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती.
-
जवळपास सहा महिन्यांनंतर या प्रकरणात आर्यनला एनसीबीकडून क्लीन चीट देण्यात आली.
-
ड्रग्ज प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खानने पहिल्यांदाच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तब्बल एक वर्षांनंतर पोस्ट शेअर केली आहे.
-
आर्यनने बहीण सुहाना आणि छोटा भाऊ अबरामबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने ‘हॅट-ट्रिक’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
आर्यन खान, सुहाना खान आणि छोटा अबराम.
-
त्याच्या या पोस्टवर शाहरुख खानने “हा फोटो माझ्याकडे कसा नाही? मला हा फोटो दे”, अशी कमेंट केली आहे.
-
चाहत्यांनीही आर्यनच्या या पोस्टवर लाइक्स आणि मजेशीर कमेंट केल्या आहेत.
-
एका नेटकऱ्याने कमेंट करत “आर्यन तुझ्याकडे पाहून शाहरुखच्या तरुणपणाची आठवण होते”, असं म्हटलं आहे.
-
तर दुसऱ्या एकाने “तू शाहरुखची कॉपी आहेस”, अशी कमेंट केली आहे.
-
आर्यन सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी इन्स्टाग्रामवर त्याचे २ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
याआधी त्याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती.
-
मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात अडकल्यामुळे आर्यन सोशल मीडियापासून लांब होता.
-
आता तो पुन्हा सक्रिय झाल्याने शाहरुखचे चाहतेही आनंदी आहेत. (सर्व फोटो : आर्यन खान/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”