-
केके उर्फ कृष्ण कुमार कन्नथ हे बॉलिवूड इंस्ट्रीत मोठं व्यक्तिमत्त्व मानले जात होते.
-
त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्ली येथे झाला.
-
दिल्ली येथेच राहणाऱ्या केके यांनी किरोडीमल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं.
-
शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्टेजवर सहज एक गाणं गायलं होतं. त्यानंतरच त्यांना गाण्याची आवड निर्माण झाली.
-
लहानपणापासूनच केके यांना संगीताची आवड होती. इतर गाणी ऐकत आणि त्यामधून शिकत त्यांनी आपलं करिअर घडवलं.
-
संगीताचं शिक्षण घेतलेलं नसतानाही आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी बरीच हीट गाणी गायली आणि त्यातून प्रसिद्धी देखील मिळवली.
-
केके यांनी त्यांचं खासगी आयुष्य मात्र या प्रसिद्धीपासून नेहमीच दूर ठेवलं.
-
केके यांनी त्यांच्या बालमैत्रिणीशी लग्न केलं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव ज्योती आहे.
-
लग्नाआधी केके यांना नोकरी शोधावी लागली होती. त्यावेळी काहीच पर्याय नसल्यानं त्यांनी सेल्समन म्हणूनही काम केलं.
-
पण ६ महिन्यांतच ते आपल्या नोकरीला कंटाळले आणि त्यांनी ही नोकरी सोडली.
-
या काळात त्यांना त्यांचे वडील आणि पत्नी यांची खंबीर साथ मिळाली आणि त्यांनी संगीत क्षेत्रात आपलं करिअर सुरू केलं.
-
२६ वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये केके यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळमसह इतरही काही भाषांमध्ये गाणी गायली.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं