-
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान मुख्य भूमिकेत ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
तब्बल चार वर्षांनंतर आमिर या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा रिमेक आहे.
-
आमिरच्या या बिग बजेट चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांनाही फार अपेक्षा होत्या.
-
परंतु प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडल्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाई करू शकलेला नाही.
-
आमिर खानबरोबर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने प्रमुख भूमिकेत आहे. ‘करमजित कौर’ हे पात्र तिने या चित्रपटात साकारलं आहे.
-
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटासाठी करीनाने आठ कोटी मानधन घेतले आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने सैनिकाची भूमिका साकारली आहे.
-
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटासाठी नागा चैतन्यने सहा कोटी मानधन घेतले असल्याची माहिती आहे.
-
अभिनेत्री मोना सिंह चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या पात्राच्या आईची भूमिका तिने साकारली आहे.
-
ही भूमिका साकारण्यासाठी तिने दोन कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
अभिनेता मानव वीज ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटासाठी त्याने एक कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
‘लाल सिंग चड्ढा’साठी आमिरने घेतलेल्या मानधनाबद्दल समाज माध्यमांमध्ये बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, आमिरने या चित्रपटासाठी तब्बल ५० कोटी रुपये मानधन घेतले असल्याची चर्चा आहे.
-
तसेच आमिरने या चित्रपटासाठी मानधन घेतले नसल्याचेही वृत्त आहे.
-
आमिरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ठरलेल्या रकमेतील ५० कोटी रुपये देण्यात आले होते.
-
परंतु, आता ओटीटीवरही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
-
१८० कोटींचे बजेट असलेल्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप ठरत आहे.
-
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत ५५ कोटींची कमाई केली आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस )

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”