-
अभिनेत्री लिसा हेडन नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिचे हे मॅटरनीटी फोटोशूट देखील बरेच चर्चेत होते. यासह बाळाच्या जन्मानंतर लिसाने स्तनपान करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यावरून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. लिसा नेहमी कोणत्याही गोष्टीवरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. (फोटो सौजन्य : लिसा हेडन/इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री कल्की कोचलिनने गरोदर असताना केलेले हे फोटोशूट चर्चेत होते. कल्कीने अनेक चित्रपटांमधून तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.(फोटो सौजन्य : कल्की कोचलिन/इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. गरोदर असताना अनुष्काने ब्रेक न घेता काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केलेल्या एका फोटोशूटमधील हा फोटो आहे. (फोटो सौजन्य : अनुष्का शर्मा/इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री करीना कपूर खानने देखील गरोदर असताना ब्रेक न घेता अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम सुरू ठेवले होते. या काळातील प्रत्येक गोष्टीची अपडेट करीना सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना देत होती. याच काळातील हे फोटोशूट बरेच चर्चेत होते. (फोटो सौजन्य : करीना कपूर/इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला. मातृत्वाचा हा काळ साजरा करण्यासाठी सोनमने अनेक फोटोशूट केले. त्यातील बोल्ड फोटोशूटवरुन तिला ट्रोल करण्यात आले. पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करत, “ट्रोलमुळे मला काही फरक पडत नाही”, अशी प्रतिक्रिया सोनमने दिली. (फोटो सौजन्य : सोनम कपूर /इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. ही गोड बातमी सोशल मीडियाद्वारे तिने तिच्या चाहत्यांना दिली. काही दिवसांपुर्वी आलियाने हे खास फोटोशूट केले. तिचे हे फोटोशूट बरेच चर्चेत होते. (फोटो सौजन्य : आलिया भट्ट /इन्स्टाग्राम)

२ एप्रिल पंचांग : ‘श्री लक्ष्मी पंचमीला’ मेष, वृषभसह ‘या’ राशींची सुखाने भरणार ओंजळ; आज तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? वाचा राशिभविष्य