-
सैफ अली खान आणि हृतिक रोशन पहिल्यांदाच एका चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे नाव विक्रम वेधा आहे.चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय.
-
विक्रम वेधा हा चित्रपट जोडी पुष्कर आणि गायत्री यांच्या २०१७मधील तमिळ ब्लॉकबस्टरचा हिंदी रिमेक आहे.
-
या चित्रपटात सैफ पोलिसाच्या भूमिकेत आहे.
-
तर हृतिक वेधा नावाच्या गँगस्टरच्या भूमिकेत आहे.
-
विक्रम वेधाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
-
“चांगलं आणि वाईट यातील एक निवडणं सोपं आहे. पण या कथेत दोघंही वाईट आहेत,” असे हृतिक वेधाच्या भूमिकेत म्हणतो.
-
मूळ तमिळ चित्रपट विक्रम वेधा नावाने असून त्यात आर माधवनने पोलिसाची भूमिका केली होती तर विजय सेतुपतीने वेधा नावाच्या व्हिलनची भूमिका केली होती.
-
विक्रम वेधा या चित्रपटातून तीन वर्षांनी हृतिक रोशन मोठ्या पडद्यावर परतला आहे. तर, सैफ शेवटचा बंटी और बबली २ मध्ये दिसला होता.
-
विक्रम वेधा हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे. (सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स