-
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी अभिनेता स्वप्निल जोशीची ओळख आहे. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.
-
स्वप्निल जोशी हा सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत झळकताना दिसत आहे.
-
सध्या तो एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे.
-
नुकतंच स्वप्निल जोशीने बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडवर अप्रत्यक्षरित्या त्याचे मत मांडले आहे.
-
त्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
-
स्वप्निल जोशीने त्याच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन तो चांगलाच चर्चेत आला आहे.
-
या फोटोत स्वप्निल जोशी, अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर हे तिघेजण दिसत आहे.
-
या फोटोला त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
रणवीर आणि अर्जुनसोबतचा फोटो शेअर करत स्वप्निल जोशी म्हणाला, “सोपी, वास्तविक आणि जादुई… तुम्ही लोक जी कोणी आहात त्याचं कारण तुम्हीच आहात… खऱ्या अर्थाने सुपरस्टार… अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद.”
-
त्याच्या या पोस्टमुळे त्याने नेटकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे. स्वप्निल जोशीच्या या पोस्टमुळे त्याला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
-
स्वप्निल जोशीने केलेली ही पोस्ट काही क्षणात व्हायरल झाली आहे. यावर एकाने “स्वप्निल काय म्हणायचय तुला? बॉयकॉट व्हायचंय?” अशी कमेंट केली आहे.
-
तर एक नेटकरी म्हणाला, “स्वप्निल हे सगळं करुन स्वत:च्या पायावर दगड नाही तर धोंडा पाडून घेतलास तू… मला नाही वाटतं आता तू पण बॉयकॉट झाल्याशिवाय राहणार ते.. शुभेच्छा.”
-
“मराठी माणूस असं वागत राहतो म्हणून आपल्याला किंमत नाही जी सिनेसृष्टी आम्ही उभी केली तिथेच हे असं वागून सगळी लायकी घालवतात”, अशी कमेंट एकाने केली आहे.

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!