-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधील काही विनोदवीरांचं तर नशिबच बदललं.
-
त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे दत्ता मोरे म्हणजेच सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे.
-
दत्तूचा सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला. दत्तू ठाण्यामधील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत लहानाचा मोठा झाला.
-
बॅकस्टेज काम करत असताना त्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
-
आता तर त्याचं नशिबचं बदललं आहे.
-
जिओ स्टुडिओ आणि महेश मांजरेकर निर्मित ‘एका काळेचे मणी’ वेबसीरिजमध्ये तो काम करताना दिसणार आहे.
-
मराठीमधील सुप्रसिद्ध चेहरे म्हणजेच प्रशांत दामले, विशाखा सुभेदार, समीर चौगुले, हृता दुर्गुळे, वंदना गुप्ते, ईशा केसकर यांच्याबरोबर दत्तू काम करताना दिसेल.
-
या वेबसीरिजनिमित्त त्याला डिजिटल विश्वास काम करण्याची संधी मिळाली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य