-
‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’ ही हॉलिवूडची वेब सिरीज लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. भारतात देखील यां सिरीजचे अनेक चाहते आहेत. या सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या सिरीजच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम भारतात आली आहे. (Photo : Tamannaah Bhatia/ Twitter)
-
नुकताच मुंबईमध्ये याचा एक प्रमोशन इव्हेंट पार पडला. या प्रमोशन इव्हेंटचे सूत्रसंचालन हृतिक रोशन आणि तमन्ना भाटिया यांनी केले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या इव्हेंटला हजेरी लावली होती. (Photo : Tamannaah Bhatia/ Instagram)
-
मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांसोबत ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’च्या सर्व कलाकारांनी खूप छान वेळ घालवला. यावेळी त्यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या हातची चवं देखील चाखली. (Photo : Vishnu Kaldoke/Twitter)
-
विशेष बाब म्हणजे सर्व कलाकारांनी यावेळी गांधी टोपी परिधान केली होती. (Photo : Vishnu Kaldoke/ Twitter)
-
सजे टायरो मुहाफिदीन, नाज़नीन बोनियादी, मैक्सिम बाल्ड्री, मार्केला कैवेनाग, सारा ज़्वांगोबानी, मेगन रिचर्ड्स, एमा होर्वथ, लॉयड ओवेन, शोरुनर जेडी पायने, चार्ल्स एडवर्ड्स आणि रॉबर्ट अरामायो या कलाकारांनी यावेळी डब्बेवाल्यांच्या जेवणाचा आस्वाद घेतला. (Photo : Vishnu Kaldoke/Twitter)
