-
साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याच्या लायगर चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे.
-
विजय आणि अनन्याची केमिस्ट्री असलेल्या या स्पोर्टस ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
-
आपल्या दमदार अभिनयाने तेलुगू चित्रपटसृष्टी गाजवणारा विजय तरुणाईचा लाडका आहे.
-
विजय सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो.
-
विजय त्याच्या घरातील फोटोही शेअर करत असतो. आज आपण त्याच्या हैदराबादमधील घराची सफर करणार आहोत.
-
विजयचे घर हैदराबादमधील ज्युबिली हील्स भागात आहे.
-
विजय हा ज्युबिली हील्समध्ये महेश बाबू, अल्लू अर्जुन, चिरंजीवी, अक्किनेनी नागार्जुना यांचा शेजारी आहे.
-
२०१९मध्ये विजय कुटुंबासह या घरात राहायला आला.
-
त्याने आणि त्याच्या कुटुंबाने जवळच्या मित्रांसाठी आणि ओळखीच्या लोकांसाठी हाऊसवॉर्मिंग पार्टी दिली होती. सेलिब्रेशनचे आयोजन केले होते.
-
विजयच्या या आलिशान घराची किंमत १५ ते २० कोटी असल्याचं म्हटलं जातंय.
-
त्याच्या या बहुमजली घराचा पेंंट पांढरा आहे. विजयच्या अनेक फोटोंमध्ये त्याच्या घराची झलक पाहायला मिळते.
-
विजयच्या घराचे प्रवेशद्वार मोठे आहे. घरात शिरल्यावर लिव्हिंग रुम आहे.
-
त्या रुममध्ये अनेक सुंदर पेंटिंग्स पाहायला मिळतात.
-
या घरात विजय त्याचे आई-वडील आणि अभिनेता भाऊ आनंद देवराकोंडासोबत राहतो. त्याचा कुत्रा स्टॉर्म देखील त्याच्यासोबत घरी राहतो.
-
करोनाकाळात विजय चित्रपटाशी संबंधित अनेक कामे घरूनच करत होता.
-
विजयच्या घरात एक स्पेशल डबिंग स्टुडिओ आहे. या स्टुडिओत तो रेकॉर्डिंग करतो.
-
विजयच्या घराला व्हाईट फ्रेंच खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमुळे घराचं लूक आणखी सुंदर दिसतं. याशिवाय त्याच्या घरात इनडोअर प्लान्ट्देखील आहेत.
-
विजय चित्रपटांच्या शुटिंगशिवायचा इतर वेळ घरीच कुटुंबासमवेत घालवणं पसंत करतो.
-
विजय लिव्हिंग रुममधील ग्रे आणि व्हाईट सोफ्यावर त्याचा फेव्हरेट पेट स्ट्रॉमसह मस्ती करताना दिसून येतो.
-
तरुणांमध्ये त्याच्या स्टाईलसाठी लोकप्रिय असणारऱ्या विजयचे घरदेखील खूप स्टायशील आहे.
-
विजयच्या घरात एक सुंदर बाल्कनी आहे. तिथे तो त्याचा लाडका पेट स्ट्रॉर्मसमवेत वेळ घालवतो.
-
याशिवाय विजयची टेरेस बाल्कनी खूप सुंदर आहे. रंगीबेगरी फुलांची झाडं आणि हिरवाईने नटलेली ही बाल्कनी वेळ घालवण्यासाठी विजयची आवडली जागा आहे.
-
विजय सर्व सणउत्सव घरात कुटुंबीयांसमवेत साजरे करतो. तो घरात आईला मदत करतानाही दिसून येतो.
-
विजय साध्या राहणीमानासाठी ओळखला जातो. त्याचं बेडरुम इंटिरियर पूर्ण व्हाईट रंगाचं असून परदे ग्रे रंगाचे आहे.
-
विजय अनेकदा त्याच्या बेडरुममधील सेल्फी आणि फोटो शेअर करत असतो.
-
घरात आई वडील आणि भागवासमवेत अभिनेता विजय देवरकोंडा…
-
दरम्यान, विजयचा लायगर चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई करतोय.
-
विजयने या चित्रपटासाठी जवळपास २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.
-
(सर्व फोटो अभिनेता विजय देवरकोंडाच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

७ एप्रिल पंचांग: बुध मार्गी होऊन ‘या’ राशींना देणार प्रचंड धनलाभ आणि सन्मान; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल आनंद; वाचा राशिभविष्य