-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांचा ‘लायगर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
-
अभिनेता विजय देवरकोंडाने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
-
चित्रपटाला संपूर्ण जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या चित्रपाटातील सगळ्याच कलाकारांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
विजय आणि अनन्या यांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते.
-
या चित्रपटासाठी कोणत्या कलाकारांनी किती मानधन घेतले हे जाणून घेण्याचा नेटकरी प्रयत्न करत आहेत.
-
विजय देवरकोंडाने या त्याच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी ३५ कोटी घेतले आहेत.
-
अभिनेत्री अनन्या पांडे हिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिने ३ कोटी मानधन आकारले आहे.
-
सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री राम्या कृष्णन यांनी हा चित्रपट करण्यासाठी 1 कोटी रुपये घेतले आहेत.
-
लोकप्रिय अभिनेता रोनीत रॉय याने या चित्रपटासाठी १.५ कोटी आकारले आहेत.
-
अभिनेते मकरंद देशपांडे हेदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी ४० लाख रुपये मानधन आकारले आहे.
-
विशू रेड्डी याने हा चित्रपट करण्यासाठी ६० लाख रुपये मानधन घेतले आहे.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ