-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘साथ निभाना साथिया’. या मालिकेने प्रेक्षकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले.
-
अभिनेत्री रुचा हसबनीसलाही याच मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
या मालिकेत तिने गोपी बहूची बहीण आणि जाऊबाई ‘राशी’ची भूमिका साकारली होती.
-
रुचा सध्या कलाविश्वापासून दूर असून संसारात रमली आहे.
-
असं असलं तरी ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
-
रुचा २०१५ मध्ये पती राहुल जगदाळेशी विवाहबंधनात अडकली.
-
१० डिसेंबर २०१९ रोजी तिने तिच्या पहिल्या गोंडस मुलीला जन्म दिला.
-
रुचाच्या मुलीचं नाव ‘रुही’ असं आहे.
-
आता ती पुन्हा आई होणार असल्याच्या बातमीने चाहतेही सुखावले आहेत.
-
रुचा आणि रुहीचा गोड फोटो.
-
रुचाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही शेअर केले आहेत.
-
फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो : रुचा हसबनीस जगदाळे/ इन्स्टाग्राम)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”