-
झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
अभिनेता सुबोध भावे सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी हजेरी लावली.
-
कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी अगदी दिलखुलास आणि मजेशीर पद्धतीने उत्तरे दिली.
-
‘बस बाई बस’ कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांना काही गाणी ऐकवण्यात आली. ही गाणी ऐकल्यानंतर कोणाचा चेहरा समोर येतो हे त्यांना सांगायचे होते.
-
‘कोण होतीस तू, काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू’ हे गाण्याचे बोल ऐकल्यानंतर कोण आठवलं, असं सुबोध भावेने त्यांना विचारलं.
-
हे गाणं ऐकताच भाजपाच्या चित्रा वाघ यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याचं किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं.
-
त्यानंतर त्यांना ‘जाने कहॉं गए वो दिन’ हे गाणं ऐकवण्यात आलं. यावर त्यांनी “आमच्या पक्षातील मनोहर जोशी”, असं उत्तर दिलं.
-
‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं ऐकताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठवल्याचे सांगितल्यावर एकच हशा पिकला.
-
पुढे त्यांना ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गाणं ऐकवण्यात आलं. गाणं ऐकल्यानंतर त्या हसल्या.
-
नंतर उत्तर देत म्हणाल्या, “आत्ताच्या घडामोडीनुसार नाना पटोलेंचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कारण ते ओझं न घेता कामात वाहून घेतात”.
-
‘दिस येतील दिस जातील’ हे गाणं ऐकल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा चेहरा समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.
-
या खेळाच्या शेवटी त्यांना ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं ऐकवण्यात आलं.
-
गाणं ऐकून क्षणभरही विचार न करता किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”.
-
यावर सुबोध भावेनही त्यांना तुम्हाला विचारही करावा लागला नाही. गाण्याचा पहिला शब्द ऐकल्यानंतर लगेचच नाव तुमच्या डोळ्यासमोर आल्याचं म्हटल्यानंतर कार्यक्रमात हशा पिकला.

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल