-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असतात.
-
नुकतंच या कार्यक्रमाचे नवीन पर्व सुरु झाले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- चार वार हास्याचा चौकार असे या नवीन पर्वाचे नाव आहे.
-
या निमित्ताने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत खळखळून समीर चौगुले, प्रिथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे कलाकार नुकतंच नागपूरकरांच्या भेटीस आले होते.
-
यावेळी नागपूर विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार यांची भेट झाली.
-
नागपूर दौऱ्यानिमित्त विमानाने प्रवास करताना हे सर्व कलाकार देवेंद्र फडणवीसांना भेटले. या भेटीचे फोटो त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहेत.
-
कलाकारांचे फोटो शेअर करताना त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात कलाकार समीर चौगुले यांना टॅग केलं आहे.
-
“हास्य अभिनेते आणि लेखक समीर चौगुले व टीम महाराष्ट्राची हास्यजत्रा यांची आज मुंबई ते नागपूर प्रवासादरम्यान भेट झाली. आपल्याला खळखळून हसविणाऱ्यांची भेट ही सदा आनंददायीच असते.” असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.
-
देवेंद्र फडणवीस आणि आपले हास्यजत्रेचे कलाकार नागपूरला जाण्यासाठी एकाच विमानाने प्रवास करत होते.
-
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे या प्रवासादरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाचे मागील भाग पाहत होते. हा निव्वळ योगायोगच घडून आला.
-
या कलाकारांना भेटल्यावर त्यांनी कलाकारांचे, कार्यक्रमाचे आणि सोनी मराठी वाहिनीचे कौतुक केले.
-
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची ओळख आहे.
-
या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
त्यानंतर आता नागपूरकरांच्या भेटीस आलेले हे कलाकार काय कल्ला करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
-
(फोटो साभार- देवेंद्र फडणवीस ट्विटर, सोशल मीडिया)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…