-
सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.
-
महिलांविषयी एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसते.
-
सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणारी ही अभिनेत्री फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करते.
-
आता हेमांगीने एक वेगळाच अनुभव तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
आता मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये हेमांगीच्या नावाचाही समावेश आहे. पण अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली तरी सामान्य लोकांसारखंच आयुष्य जगणं हेमांगीला आवडतं.
-
म्हणूनच की काय ४१ वर्ष मुंबईत राहून पहिल्यांदाच ताज हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं वाटलं? हे तिने एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.
-
हेमांगी म्हणते, “लहानपणापासून वाटायचं साला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार…४१ वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेलमध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो.”
-
“मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात एसी, इमारतीला लिफ्ट, २४ तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा ही सगळी साधनं. परिस्थिती आता सुधारली आहे बरं म्हणायला पुरेशी असली तरी मध्यम वर्गीय मानसिकता गळून पाडेल याची हमी देत नाहीत. पण वाढदिवसानिमित्त पहिल्यांदाच ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला.”
-
आजवर भारतात तसेच भारताबाहेर अनेक मोठ्या हॉटेलमध्ये हेमांगी जाऊन आली. पण ताजमध्ये जाण्याची तिची कधीच हिंमत झाली नाही.
-
तिथे चहाची किंमत किती आहे हे देखील तिने सांगितलं. ताजमध्ये एक चहा जवळपास ५०० रुपयांना मिळतो असं हेमांगीने म्हटलं आहे.
-
इतकंच नव्हे तर ताजमधील स्वतःचे काही फोटो पोस्ट करत हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापासून ते तिथे आलेला अनुभव याचं वर्णन तिने केलं. (सर्व फोटो – इनस्टाग्राम)
आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण