-
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी बरीच गाजली. ज्यांच्या अफेअरचीच नाही तर भांडणाचीही जोरदार चर्चा झाली.
-
ऐश्वर्याला सलमान खानच्या रागीट स्वभावामुळे खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.
-
सलमान खान आणि ऐश्वर्या राय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
जेव्हा या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर आली तेव्हा या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.
-
सलमान- ऐश्वर्याची मैत्री, प्रेमात बदलली, जवळीक वाढली, इतरांप्रमाणे यांच्यातही वाद झाले.
-
पण अखेर एक वेळ अशी आली की रोजच्या वादांना कंटाळून ऐश्वर्याने सलमानपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
-
सलमान खान ऐश्वर्याच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह होता. सलमानचं विनाकारण प्रत्येक गोष्टीत बोलणं, व्यावसायिक आयुष्यात हस्तक्षेप करणं ऐश्वर्याला अजिबात आवडत नव्हतं.
-
त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला होता आणि ऐश्वर्याने सलमानपासून दूर जायला सुरुवात केली होती.
-
अर्थात हे सलमानला सहन झालं नाही. त्याला या सगळ्याचा भयंकर राग आला आणि यामुळे ऐश्वर्याला खूप मोठं नुकसान झालं होतं.
-
२००३ साली ऐश्वर्या राय अभिनेता शाहरुख खानसह ‘चलते चलते’ चित्रपटाचं शूटिंग करत होती.
-
मीडिया रिपोर्टनुसार एके दिवशी शूटिंग सुरू असतानाच सलमान खान चित्रपटाच्या सेटवर पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याने खूप मोठं भांडण केलं.
-
एवढंच नाही तर त्याने सेटवरील सामानाचीही तोडफोड केल्याचं बोललं जातं. या सर्व गोष्टींमुळे प्रोडक्शन हाऊसचं खूप मोठं नुकसान झालं होतं.
-
सलमान खान आणि ऐश्वर्याचं नात तुटण्याच्या मार्गावर होतं. दोघांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत होते.
-
त्यांच्यातील भांडणामुळे फिल्ममेकर्सना नुकसान होत होतं. या दोघांमधील संबंध सुधरावेत यासाठी शाहरुख खानने भांडणात हस्तक्षेप केला होता असं बोललं जातं.
-
पण शाहरुखने सलमानला समजावण्याचा प्रयत्न अपयशी ठरला आणि सलमान खान शाहरुखवरच भडकला.
-
(फोटो साभार- सोशल मीडिया, इन्स्टाग्राम)
