-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नयनतारा आणि विघ्नेश ९ जूनला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर आता दोन महिन्यांनी ते स्पेनमध्ये हनिमून साजरा करत आहेत.
-
स्पेनमधील अनेक फोटो विघ्नेशने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
-
नयनतारा-विघ्नेश स्पनेमधील विविध ठिकाणांना भेटी देत आहेत.
-
स्पेनमधील नयनतारा-विघ्नेशचा रोमॅंटिक फोटो.
-
नयनतारा-विघ्नेशचे रोमॅंटिक फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
परंतु, सध्या या रोमॅंटिक फोटोंबरोबरच त्यांच्या हनिमूनच्या खर्चाचीदेखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
-
नयनतारा-विघ्नेशने हनिमूनसाठी एकही रुपया खर्च केलेला नाही.
-
त्यामुळे त्यांच्या या शून्य रुपयांतील हनिमूनची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
-
नयनतारा-विघ्नेशने हनिमूनसाठी एकही रुपया खर्च केला नाही तर मग त्यांच्या हनिमूनचा खर्च कोण करत आहे?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
-
स्पेनमधील एका आलिशान हॉटेलमध्ये नयनतारा आणि विघ्नेश थांबले आहेत.
-
माहितीनुसार, या हॉटेलचं एका दिवसाचं भाडं अडीच लाख रुपये इतकं आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून नयनतारा-विघ्नेश यांचा हनिमूनचा खर्च केला जात आहे.
-
नयनतारा-विघ्नेश यांच्या लग्नाची डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
-
‘बियॉण्ड द फेरी टेल’ असं त्यांच्या डॉक्युमेंटरीचं नाव असून येत्या ३० डिंसेबरला फिल्म प्रदर्शित होणार आहे.
-
नयनतारा-विघ्नेशच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीचं प्रमोशन करण्यासाठी त्यांचा हनिमून स्पॉन्सर करण्यात आल्याची माहिती आहे.
-
(सर्व फोटो : विग्नेश शिवण/ इन्स्टाग्राम)
![Indian Super Mom](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Indian-Super-Mom.jpg?w=300&h=200&crop=1)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास