-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
दीपा परबसुद्धा अभिनेत्री असून तिने अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे.
-
दीपाने नुकतंच छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
-
झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
या मालिकेच्या निमित्ताने तिने घरी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो याबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.
-
“गणपती मला खूप प्रिय आहे, मी लोअर परळला राहायचे. माझ्या करियरची सुरुवात गणेशोत्सवापासूनच झाली”, असे दीपाने सांगितले.
-
“या उत्सवातच कार्यक्रम करून मी माझ्या करियरचा श्रीगणेशा केला”, असेही तिने म्हटले.
-
“माझ्या घरी गणपती येत नाही पण घरी देवघरातल्या गणपतीची मी मनोभावे पूजा करते”, असेही ती म्हणाली.
-
“या वर्षी मी ‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा पदार्पण करत आहे ते सुद्धा ह्या गणरायाच्या आशीर्वादानेच”, असे दीपा परब म्हणाली.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच