-
वादग्रस्त ट्वीट आणि वक्तव्य करणाऱ्या अभिनेता समीक्षक कमाल खान म्हणजेच ‘केआरके’ला आज अटक करण्यात आली आहे.
-
२०२० मध्ये त्याने स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल काही वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यासाठीच त्याला अटक करण्यात आली आहे.
-
केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो.
-
पण आता त्याला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे.
-
केआरकेला अटक झाली आणि दुसरीकडे नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यास सुरुवात केली.
-
बॉलिवूड कलाकारांचे काही फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत.
-
हे मीम्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरनार नाही.
-
एका मीम्समध्ये तर केआरकेला पोलिसांचा मार मिळत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
-
तर दुसऱ्या मीम्समध्ये ‘आता मजा येणार’ हे वाक्य विशेष लक्ष वेधून घेणारं आहे.
-
तर काहींनी केआरकेचा फोटो एडिट करत मजेशीर मीम्स तयार केले आहेत.
-
(सर्व फोटो – ट्विटर)

आता दु:खाचे दिवस संपणार! चैत्र पौर्णिमेच्या आधी ‘या’ राशींच्या दारी पैसा येईल चालून? रखडलेली कामे होऊ शकतात पूर्ण