-
आज गणेश चतुर्थीनिमित्त भक्तांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे.
-
बॉलिवूडसह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी गणरायाची स्थापना केली जाते.
-
मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे याच्या घरीही आज बाप्पांचं आगमन झालं.
-
त्याच्या पुण्यातील घरी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.
-
सुबोधने कुटुंबीयांसह गणरायाची पुजा केली.
-
सुबोधच्या घरचा गणपतीचा देखावा लक्ष वेधून घेतोय.
-
सुखी आणि दुःखी पृथ्वी असा फरक दाखवणारा देखावा सुबोधच्या मुलांनी साकारला आहे.
-
कमी विकास झालेल्या भागातील पृथ्वी सुखी आहे आणि जास्त विकास झालेल्या भागातील पृथ्वी दुःखी आहे, असा देखावा सुबोधच्या मुलांनी साकारला आहे.
-
(फोटो – सागर कासार, लोकसत्ता प्रतिनिधी)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”