-
‘राधा प्रेम रंगी रंगली’ तसचं ‘आई माझी काळू बाई’ अशा या मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे वीणी जगताप.
-
वीणीने ‘बिग बॉस मराठी’ या शोमधूनही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली. वीणा सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते.
-
वीणाने नुकताच तिच्या घरच्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
मराठमोळ्या साडीमधला वीणाचा लूक आणि तिचा बाप्पा लोकांना फारच पसंत पडला आहे.
-
प्रत्येक फोटोमध्ये वीणाचा उत्साह आणि गणरायाच्या आगमनामुळे झालेला आनंद सहज झळकतोय.
-
वीणा अत्यंत मनोभावे गजाननाची सेवा करत आहेत.
-
त्या व्हिडिओच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटोजसुद्धा वीणाने शेअर केले आहेत.
-
गणेशोत्सवानिमित्त वीणाने एक गाण्याचा व्हिडिओसुद्धा शूट केला आहे.
-
वीणाचे बाप्पाबरोबरचे फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहेत आणि तिच्या चाहत्यांना तिचा हा मराठमोळा लूकही प्रचंड आवडला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”